चिखली ः टीम न्यू महाराष्ट्र
गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या वडमुखवाडी येथील श्री. सयाजीनाथ महाराज विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. विद्यालयातील साक्षी शामसुंदर दयाळ हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
तर तुषार संतोष भगत याने ९४.८० टक्के गुण मिळवत द्वितीय व प्रसाद ज्ञानेश्वर कापसे आणि उन्नती संतोष नृपनायण या दोघांनी ९३.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यालयातील तब्बल २१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी या विद्यालयातील २७१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ मोझे, संस्थेच्या सदस्या प्रा. अलका पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, प्राचार्य राजकुमार गायकवाड तसेच विभाग प्रमुख नितीन वारखडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक शरद मुंगसे, डॉ. कल्याण वाघ, रमेश रकटाटे, ललिता ठाकूर तसेच सर्व विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.