पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
चिखली, मोरे वस्ती येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूलमध्ये युनिट पातळीवर स्काऊट गाईडच्या वतीने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. या निमित्त कब, बुलबुल, स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ सेवन विरोधी दिन शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लॉर्ड बेडन् पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले, दामिनी पथकाच्या जयश्री मिडगुले, भाग्यश्री आहेर, सुजाता शिंदे, सीमा हाके यांनी शाळेत येऊन सध्याच्या परिस्थितीबाबत जागरूक करून सावध राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. फ्लाॅक लीडर शिक्षिका प्रियदर्शनी खोमणे, गणेश मांढरे , गाईड कॅप्टन विद्या गायगोळ यांनी मुलांकडून अमली पदार्थ विरोधी शपथ घेतली. शाळेच्या संस्थापिका निर्मला जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवन केल्यावर त्याचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात याबद्दल तसेच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त भारत करण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे सचिव मारुती जाधव, प्रार्चाया अश्विनी जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.