मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस मधून 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जीआरपी आणि आरपीएफने ही संयुक्त कारवाई केली आहे. कपड्याच्या पार्सल पाठवण्याच्या नावाखाली रोकड पाठवण्यात आली होती. आरपीएफला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आलीये.