पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
पुणे कस्टम विभागाने सोलापूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. ओडीसा येथून आलेला तब्बल 883.1 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे दोन कोटी 20 लाख एवढी आहे.
ट्रक चालक सुधीर चव्हाण (वय 32, रा. नरसिंहपूर, सोलापूर) याला कस्टमने ताब्यात घेतले आहे.
पुणे कस्टमचे आयुक्त यशोधन वानगे यांनी याबाबत माहिती दिली की, पुणे कस्टम विभागाला माहिती मिळाली की, ओडीसा येथून एका ट्रकमध्ये गांजा आणला जात आहे. त्यानुसार कस्टम विभागाने सोलापूर येथे सापळा लाऊन एक आयशर ट्रक ताब्यात घेतला.
ट्रकमध्ये वरच्या बाजूला इतर माल ठेवण्यात आला होता. त्याखाली गांजा होता. कस्टमने वरचा माल बाजूला करून आतील बाजूला पाहणी केली असता तिथे त्यांना 883.1 किलो वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत सुमारे दोन कोटी 20 लाख रुपये आहे.