न्यू महाराष्ट्र – मुलांच्या शाळेच्या समोर असणारे ( Pimpri News) धोकादायक होर्डिंग ताबडतोब काढावेत. छोटे मोठे अनधिकृत फ्लेक्स जे लावत असतील त्यांच्यावर कडक ऍक्शन घेण्याची मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे.
शहरातील आशा सर्वच शाळेच्या समोर असणाऱ्या होर्डिंग त्वरित काढून घ्यावेत तसेच पिंपरी चिंचवड शहरात जे नागरिक, राजकीय पक्षाचे नेते छोटे मोठे अनाधिकृत होर्डिंग,फ्लेक्स लावतील त्यांच्यावर कारवाई करून आशा राजकीय पक्षांच्या नेत्यांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करता येईल का, अशाप्रकारे काही करता येईल का, यावर विचार व्हावा आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता आशा सर्व होर्डिंग काढून शहराचे विद्रुपीकरण थांबावे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील बऱ्याच लहान मुलांच्या शाळेच्या समोर तसेच शाळेच्या बस ज्या ठिकाणी उभा राहतात अशा ठिकाणी खूप मोठे होर्डिंगचे सांगाडे उभे केलेले आहेत. ही खूप धोकादायक बाब आहे. हे होर्डिंगसाठी कोणी कशी परवानगी दिली हे अनाकलनीय आहे.
कमीत कमी लहान मुलांच्या शाळेच्या समोरील उभे केलेले हे होर्डिंगचे सांगाडे त्वरित काढावे आणि भविष्यात काही अनर्थ घडणार नाही यांची दक्षता आयुक्तांनी घ्यावी ही आमच्या फेडरेशनची शहरातील नागरिकांच्या वतीने मागणी आहे
महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाचा कारभार अतिशय गलथान आहे. हा विभाग सर्वच राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करतोय.आज जे शहरात सर्व ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे व इतर राजकीय कार्यक्रमाचे अनाधिकृत होर्डिंग व फ्लेक्स लागत आहेत. शहर विद्रुप होत आहे याला सर्वस्वी आकाश चिन्ह परवाना विभाग जबाबदार आहे.