सुधारित विकास आराखड्यात पूररेषांमध्ये हेराफेरीचा आरोप ; सिमा सावळे यांचा घणाघात

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नुकताच जाहीर केलेल्या सुधारित विकास आराखड्यात (DP) पूररेषांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करून प्रभावशाली आणि धनदांडग्यांच्या हितासाठी हेराफेरी केल्याचा गंभीर आरोप माजी स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी केला आहे.

सीमा सावळे म्हणाल्या, पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पूररेषांमध्ये बदल करून काही विशिष्ट भूखंड पूरधोक्याच्या क्षेत्राबाहेर दाखवले गेले, तर दुसरीकडे चिखलीसारख्या भागातील सामान्य नागरिकांची घरे पूररेषेत येतात म्हणून निर्दयपणे पाडण्यात आली.

महत्त्वाचे मुद्दे:
🔹 पूररेषांमध्ये तफावत:
जलसंपदा विभागाच्या काटछेद नकाशानुसार पूररेषेत येणारी गावे व भूखंड, सुधारित DP मध्ये मात्र पूररेषेबाहेर दाखवण्यात आले आहेत.
प्रमुख तफावती स.नं.:

चिखली – स.न. १६७०, २८१

मोशी – स.न. ५८ ते ६०, ७५, ७६, ७७

रहाटणी – स.न. ९९ ते १०५

पिंपळे सौदागर – स.न. १८२

किवळे – स.न. ५५, ५६

🔹बुलडोझर, श्रीमंतांचे रक्षण:

गरीबांवर चिखलीतील गरीब नागरिकांची घरे पूररेषेच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आली. याउलट, पिंपळे सौदागर व इतर भागांतील प्रभावशाली लोकांच्या जमिनी सुरक्षित ठेवण्यात आल्या. सावळे यांनी हा दुहेरी न्याय असल्याचे ठामपणे सांगितले.

🔹 पूर्वीचाही बनावट नकाशा प्रकरण:
चिंचवडमध्ये यापूर्वीही पूररेषेचा बनावट नकाशा तयार केल्याचे समोर आले होते. त्यामुळे एकाच भागासाठी दोन वेगवेगळे नकाशे सादर करून दिशाभूल करण्यात आली होती.

🔹 गंभीर चौकशीची मागणी

णी:या प्रकरणात सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सिमा सावळे यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply