पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
शिवसेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करत मावळ लोकसभा क्षेत्रात राजेंद्र तरस यांची युवासेना लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीने पिंपरी-चिंचवड, किवळे, मामुर्डी आणि विकासनगर परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजेंद्र तरस हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विकासनगर, किवळे आणि मामुर्डी परिसरात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांचे विशेष स्थान निर्माण झाले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी २४ तास उपलब्ध असणारे आणि फिक्स नगरसेवक अशी ओळख असलेले राजेंद्र तरस हे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अतिशय विश्वासू सहकार्यांपैकी एक आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, सचिव राहुल लोंढे, किरण साळी आणि युवासेनेचे सचिव विश्वजीत बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या झाल्या आहेत.
राजेंद्र तरस यांच्या नियुक्तीमुळे मावळ लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेची संघटना अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत युवा सेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात युवा सेनेचे आणि शिवसेनेची संघटत्नात्मक तादक आणि बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील
राजेंद्र तरस ः अध्यक्ष, युवा सेना मावळ लोकसभा मतदारसंघ.
