आकुर्डी ः टीम न्यू महाराष्ट्र
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चार दिंड्यांमधील सातशे वारकऱयांचा मुक्काम आकुर्डी येथील वर्ल्ड आॅफ मदर या सोयसाटीत होता. या वारकऱ्यांना सोसायटीच्या वतीने रात्री अन्नदान करण्यात आले. तर शुक्रवारी चहा, नाश्ता देऊन निरोप देण्यात आला.
पालखी सोहळा गुरुवारी रात्री आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी होता. या सोहळ्यातील दिंड्यांच्या मुक्कामुळे वर्ल्ड आॅफ मदर सोसायटी परिसर भक्तीमय झाला होता. रात्री अभंग, कीर्तनाचे स्वर आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने वातावरण चैतन्यमय झाले होते. या वेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, मोरेश्वर शेडगे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
सोसायटीच्या अध्यक्षा नंदा चौधरी, महादेव चौधरी, खंडोदेव कटारे, गणेश चिखले,अतुल कटारे,प्रताप कटारे, मनोज साळी, योगेश आल्हाट यांनी संयोजन केले. या सोसायटीत गेल्या १३ वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा केली जात आहे.
