सिद्धिविनायक पब्लिक स्कूलमध्ये चित्तथरारक योग प्रात्यक्षिके

चिखली ः टीम न्यू महाराष्ट्र

चिखली, मोरे वस्ती येथील  सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथे शनिवारी (दि. २१ ) आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  शाळेच्या प्रांगणात विविध योगासने व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा निर्मला जाधव, सचिव मारुती जाधव, तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेख योग प्रात्यक्षिकांद्वारे झाली. विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान प्रकारांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी योगाचे शास्त्रशुद्ध दर्शन घडविले. विद्यार्थ्यांचे हे सादरीकरण उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले.

संस्थेच्या अध्यक्षा निर्मला जाधव यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक फायदे समजावून सांगितले. त्यांनी नियमित योगाभ्यासामुळे आरोग्य सुदृढ राहते व एकाग्रता वाढीस लागते, असे नमूद केले.

या उपक्रमासाठी क्रीडा शिक्षक गणेश मांढरे आणि विद्या गायगोळ  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे उत्कृष्ट सादरीकरण करणे शक्य झाले.

कार्यक्रमाचे संयोजन नियोजनबद्धपणे करण्यात आले होते. योग दिनाच्या निमित्ताने शाळेत आरोग्य व तंदुरुस्तीचा संदेश पोहोचविणारा एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.

Leave a Reply