पतित पावन संघटनेची सह्याद्री हाॅस्पिटलसमोर निदर्शने

  कोकण मित्र मंडळ व मणिपाल हॉस्पिटलच्या करारावर आक्षेप

पुणे: टीम न्यू महाराष्ट्र

पतित पावन संघटनेच्या वतीने शनिवारी (दि.२६) दुपारी साडे चार वाजता सह्याद्री हॉस्पिटलसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये कोकण मित्र मंडळ, सह्याद्री हॉस्पिटल व मणिपाल हॉस्पिटल यांच्यात झालेल्या कराराची प्रत जाळण्यात आली.

संघटनेने स्पष्ट मागणी केली की, पुणेकरांच्या मालकीच्या परस्पर महानगर पालिका व धर्मदाय विभागाला न कळवता केलेला हा करार त्वरित रद्द केला जावा. त्याचप्रमाणे, संबंधित हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल करावा आणि महाराष्ट्र शासनाने सदर हॉस्पिटल ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली.

यावेळी शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर आणि कार्याध्यक्ष गोकुळ शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. यामध्ये शहर पालक मनोज नायर, जिल्हा अध्यक्ष सुनील मराठे, उपाध्यक्ष निलेश जोशी, संघटक विजय गावडे, सह संघटक शरद देशमुख, चिटणीस राजाभाऊ बर्गे, सहसंपर्क प्रमुख राहुल पडवळ, कॉलेज विभाग प्रमुख तेजस पाबळे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

निदर्शनांच्या वेळी छत्रपती शिवाजी नगर विभाग अध्यक्ष शुभम परदेशी, अनंत जाधव, दीपक परदेशी, आदित्य बर्गे, अनिल विटकर, शौनक काटीकर, गणेश गालिंदे, ओंकार शेलार, सोहम गालिंदे आणि अनेक अन्य कार्यकर्त्यांनी आपले समर्थन व्यक्त केले.

तसेच, या करारावर आक्षेप घेणाऱ्यांनी सरकारकडे त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

Leave a Reply