तळवडे येथील ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ला प्रशासनाचा ‘ग्रीन सिग्नल’

– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
– राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ योजनेतून निधी उपलब्ध

पिंपरी, टीम न्यू महाराष्ट्र :

पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात भर घालणारा ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ (जैवविविधता उद्यान) तळवडे येथे विकसित करण्यात येत आहे. सुमारे ७० एकर जागेत होणारा हा प्रकल्पामुळे निगर्स परिसंस्थेचा जीर्णोद्धार होणार आहे. महानगरपालिका स्थायी समिती सभेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी तळवडे येथे ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी महानगरपालिका, राज्य सरकारकडे सातत्त्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ योजनेतून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

महापालिका सहशहर अभियंता मनोज सेठिया म्हणाले की, तळवडे येथील जैवविविधता उद्यान मानव आणि निसर्ग यांच्यातील अधिक शाश्वत आणि सामंजस्यपूर्ण सहअस्तित्वाचा मार्ग प्रकाशित करेल. पुनर्संचयित उपक्रम, शैक्षणिक कार्यक्रम आणि सामुदायिक सहभाग याद्वारे पार्क जागरूक पर्यावरणीय कारभाराच्या परिवर्तनीय शक्तीचे उदाहरण देईल. या पुनरुज्जीवित लँडस्केपच्या सौंदर्याचा विचार करता भविष्यातील शहराच्या सौंदर्याला आकार देईल. जैवविविधतेचे संरक्षण ही केवळ गरज नाही, तर एक सामूहिक जबाबदारी आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस अमृत गटात राज्य स्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. तसेच, भूमी थीमॅटिक पार्कमधील उच्चतम कामगिरीसाठीही बक्षीस मिळाले आहे. अशी एकूण १० कोटी रुपयांची रक्कम प्रकल्पाच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. तसेच, उर्वरित खर्च केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीकरिता राज्यांना विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्य शासनास प्राप्त अर्थसहाय्य निधीमधून जैवविविधता उद्यान (बायोडायर्व्हसिटी पार्क) विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य मिळवण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.


आहे बायोडायर्व्हसिटी पार्क

बायोडायव्हर्सिटी पार्कचे नियोजन सुमारे ७० एकर जागेत केले आहे. याठिकाणी देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. किंबहुना जंगल विकसित करण्यात येणार आहे. प्राणी, पक्षी अधिवास या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे. मृदा संवर्धन, विविध थीमद्वारे वृक्षारोपण, एन्ट्रान्स गेट, बर्ड नेस्ट वॉल, पार्किंग, गोल्फ कार्ट ॲन्ड सायकल स्टेशन, ३ एन्ट्रान्स प्लाझा, ॲम्पिथिएटर, सोयुवेनिअर शॉप, वर्कशॉप, कॅपे, बटरफ्लाय गार्डन, रिपेरिअन ॲन्ड वेटलँन्डस, ऑर्चिडट्रम, थीम पार्क- कलर्स् ॲड कोअर फॉरेस्ट, टॉयलेट ब्लॉक्स, बायो डिझास्टर, किऑक्स, स्ट्रिम क्रॉसिंग, साइनेज, साईनेज ॲन्ड ग्राफीक फॉर इकॉलॉजी अवेअरनेस, बेन्चेस, लाईटिंग- जनरल लाईटींग, पाथवेज, पिकनिक स्पॉट, रेस्टॉरंट एरिआ, ब्रिज लाईटिंग, व्हिजीबिलीटी लाईटिंग फॉर साईट, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, वेस्ट मॅनेजमेंट, साईल ॲन्ड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट असा अत्याधुनिक सोयी-सुविधांचा बायोडायव्‍हर्सिटी पार्क पिंपरी-चिंचवडच्या सौंदर्यामध्ये भर घालणार आहे.


पर्यावरण प्रदूषण वसुंधरेचा ऱ्हास रोखण्याचे आव्हान मानवजातीसमोर आहे. ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित हाेत आहे. मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा समतोल टिकावा. महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहयोगातून पिंपरी-चिंचवड परिसरातील जैवविविधता टिकावी. त्याचे संवर्धन व्हावे. निसर्ग परिसंस्थेचे जतन व्हावे. भावी पिढीला स्वच्छ हवा आणि नैसर्गिक सहवास लाभावा. या करिता जैवविविधता उद्यान विकसित करण्याचा संकल्प केला होता. त्याअनुशंगाने महानगरपालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतील, असा विश्वास वाटतो. आगामी काळात या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामाला सुरूवात करावी, अशी अपेक्षा आहे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Share

Leave a Reply