– अजित गव्हाणे यांनी घेतल्या मतदारांच्या भेटी-गाठी
– भोसरी विधानसभेला आता लोकाभिमुख नेतृत्व देवू, मतदारांचा विश्वास
भोसरी, प्रतिनिधी (2 नोव्हेंबर): – महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी शनिवारी (दि.२ नोव्हेंबर) भोसरीतील विविध परिसरात मतदारांच्या भेटी-गाठी घेत प्रचार केला. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी अजित गव्हाणे यांचे स्वागत करत भोसरी विधानसभेत परिवर्तनासाठी त्यांच्या विजयाचा निर्धार केला.
भोसरी येथील शांतीनगर भागातून अजित गव्हाणे यांच्या प्रचारफेरीला सुरुवात करण्यात आली. पुढे हुतात्मा चौक, हनुमान कॉलनी, आळंदी रोड येथील संत ज्ञानेश्वर नगर, जय महाराष्ट्र चौक परिसरात अजित गव्हाणे यांनी नागरिकांची भेट घेतली. त्यांनी सर्वांना दिळीच्या शुभेच्छा देत येत्या २० नोव्हेंबरला भोसरी विधानसभेत विजयी तुतारी फुंकण्याचे आवाहन केले.
या प्रचारफेरीत ज्येष्ठ पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अजित गव्हाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. अनेक ठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून, तर यूवा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गव्हाणे यांचे स्वागत केले. तसेच, यावेळी या भागाचे नेतृत्व करताना कायम सर्वसमावेशक कामे आणि विकास करण्याची भूमिका अजितभाऊंनी घेतली. त्यांनी सत्तेत असताना सत्तेचा दुरुपयोग आणि विरोधात असताना कोणताही अतिरेक केला नाही. त्यांच्या निमित्ताने लोकाभिमुख असा आमदार भोसरीला मिळणार असून त्यांच्या पाठिशी आम्ही उभे राहणार, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
भोसरीतील मतदारांच्या विश्वासाचे बळ आपल्या पाठिशी: अजित गव्हाणे
भोसरीतील मतदारांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी सातत्याने आपल्यावर टाकलेल्या विश्वासामुळे नगरसेवक म्हणून चांगले काम करु शकलो. येथील मतदारांनी आणि सहका-यांनी दिलेली साथ, थोरांमोठ्यांचे आशिर्वाद पाठिशी आहेत. त्या जोरावर भोसरी विधानसभा मतदारसंघात विजयी गुलाल उधळण्याचा मानस सर्वांनी केलेला आहे. तुतारीला मतदान करून सकारात्मक, सर्वसमावशी राजकारणाची सुरुवात आणि विकासाला योग्य दिशा देण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक मतदार तयार आहे, असे अजित गव्हाणे यांनी यावेळी म्हटले.