नाशिकच्या निफाड येथे वायू दलाचे विमान कोसळले

नाशिक: टीम न्यू महाराष्ट्र

नाशिकमध्ये वायू दलाचे विमान कोसळल्याची आज (मंगळवारी) दुपारी घटना घडली आहे. नाशिकच्या पिंपळगाव ते शिरसगाव परिसरात वायू दलाचे सुखोई 30 विमान कोसळलं.

या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पायलट पॅराशूटच्या सहाय्याने विमान बाहेर पडल्याने तो सुखरूप आहे. हे विमान एका द्राक्षाच्या बागेत कोसळले आहे. विमान कोसळल्या नंतर तेथे बघ्यांनी गर्दी केली होती. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा असे अंदाज व्यक्त केला जात आहे.

Share

Leave a Reply