भोसरी; टीम न्यू महाराष्ट्र – इंद्रायणीनगर पोलीस लाईन सुवर्णयुग मित्र मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक मंगळवारी पार पडली. त्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. मंडळाने सामाजिक भान ठेवत मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि उत्साहात पार पडली. मूर्तीचे विसर्जन मोशी इंद्रायणी घाटावर करण्यात आले.
अध्यक्ष ब्रह्मानंद कोरपे, उपाध्यक्ष सूरज काशीद, कार्याध्यक्ष अमर माळी, कार्यकर्ते सुधीर जाधव, प्रिशित खुटाल, सूरज डोमाळे, ओंकार साबळे, तुषार मुदगुण, कृष्णा काळे, अक्षय काठे, नितीन विरणक, अभिषेक पाटेकर, निलेश विरणक, प्रणित ढेंगळे, कुमार ढेंगळे, अजित गाबले, अक्षय माळी, आशिष पोखरकर, गौरव खंडागळे आदी उपस्थित होते.