पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र
पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस हवालदार सचिन नरोटे यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई- बंगळुरू महामार्गावर घडली. अज्ञात वाहनचालक फरार असून त्याचा शोध पिंपरी- चिंचवड पोलीस घेत आहेत. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार सचिन नरोटे हे सोमवारी ( दि 15 ) कर्तव्यावर असताना अज्ञात वाहन चालकाने त्यांना जोरदार धडक दिली आणि तो घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.