महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या वतीने स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त अभिवादन
भोसरी , टीम न्यू महाराष्ट्र :
माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना न्याय देऊन माथाडी संघटन नावारूपाला आणले. गोरगरीब, कष्टकरी, माथाडी कामगारांकरिता केलेले कार्य हे एका दीपस्तंभासारखे आहे. माथाडी कामगारांच्या कौटुंबिक आर्थिक, सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल होण्यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील असे कामगार नेते तथा शिवसेना उपनेते इरफान सय्यद म्हणाले.
चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष परेश मोरे, जनरल सरचिटणीस प्रवीण जाधव, उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, सचिव सर्जेराव कचरे, मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कदम, रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश कंठाळे, संघटनेचे खजिनदार नागेश व्हनवटे ¸ गोरक्षनाथ दुबाले,¸ बबन काळे,¸ पांडुरंग काळोखे ¸ ,संपत मांढरे, ¸ श्रीकांत मोरे, ¸ अशोक साळुंखे¸,बबन काळे, समर्थ नाईकवाडे,अमित पासलकर ¸ अविनाश जांभळे ¸ नाना नाईकवाडे¸ ज्ञानेश्वर घनवट,¸ गिरीश देशमुख ¸,चंद्रकांत पिंगट, ¸ सोमनाथ फुगे, ¸ सोपान गाडगे ¸, सतीश शिंदे, ¸ धुळा शेंडगे ¸, रोशन दोलताडे, ¸ सुनिल माने ¸, ज्ञानदेव पाचपुते ¸ कैलास तोडकर ¸, जयराम केगार ¸, आयुष शिंदे ¸ रत्नाकर भोजने उपस्थित होते.
इरफान सय्यद म्हणाले सध्या माथाडीमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे माथाडी कामगार व कायदा बदनाम झाला आहे. गाव खेड्यातून आलेला आमचा माथाडी कामगार कधीही दादागिरी करीत नाही. प्रामाणिकपणे काम तो करुन श्रमाचा मोबदला मागतो. चुकीचे लोक माथाडीच्या नावाखाली कंपनी व्यवस्थापनाला व माथाडी कामगारांना वेठीस धरतात. त्यात आपला गोरगरीब कष्टकरी कामगार भरडला जात आहे . यासाठी सर्व कामगारांनी एकजुटीने सदरील समस्यांवर लढा उभारला पाहिजे. उद्योग टिकले तरच कामगार टिकेल, असे मत महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.