आशिष जाधव यांची पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती

देहूरोड : प्रतिनिधी

देहूरोड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक आशिष जाधव यांची पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती झाली झाली आहे. त्याबद्दल पोलिस दलासह विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. सध्या त्यांची मंबई येथे बदली झाली आहे.

आशिष जाधव हे मुळचे कोल्हापूर शहरातील साने गुरुजी वसाहत येथील रहिवाशी. ते २०१० मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी पोलिस दलात भरती झाले. मुंबई येथील चेंबूर पोलिस ठाण्यात त्यांची पहिली पोस्टींग झाली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक म्हणून विशेष सुरक्षा विभागात अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सध्या ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तायलयाती देहूरोड पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरिक्षकपदी कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिघी येथील बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश करुन चोर आरोपींच्या मुसक्या आ‌वळ्या होत्या. या कारवाईत नोटा छापण्याच्या मशिनसह बनावट नोटा व साहित्य जप्त केले होते. विकासनगर येथील विशाल थोरी खून प्रकरणातील आरोपींनाही काही तासांत त्यांनी गजाआड केले. तसेच गांजा आणि गुटख्याचा साठा जप्त करण्याच्या कारवायासुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात केल्या आहे. देहूरोड पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी कारवाया रोखण्यात त्यांना यश आले आहे.

Share

Leave a Reply