वाढदिवस विशेष…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि पिंपरी विधानसभेचे भावी आमदार बाळासाहेब ओव्हाळ उर्फ आण्णा अशी गरुडझेप घेणा-या नेतृत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने आदरणीय आण्णांना शब्दरूपी शुभेच्छा..
पिंपरी चिंचवड शहराचे लोकनेते आमदार स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचा वैचारिक वारसा पुढे नेऊन समाजाची सेवा करणारे आधुनिक काळातील सर्वांचा आपुलकीचा माणुस अर्थात मा बाळासाहेब ओव्हाळ आहेत.सदाबहार, हसतमुख, सदैव तजेलदार आणि उत्साही असे हे व्यक्तीमत्व आहे.
कमी पण, अर्थपूर्ण बोलणे, संयमी पण, आक्रमक तितकेच परखड! विविध विषयांची जिज्ञासा, व्यापकता, व्यासंगीही ! आपले काम नेटाने करणे, उत्तम नेतृत्व कौशल्य गुण असणारे तसेच भारदस्त, दमदार व्यक्तिमत्व म्हणजेच आपले पिंपरी शहराचे भावी आमदार मा बाळासाहेब ओव्हाळ होय. बाह्य अंगाने थोडीसे कणखर वाटणारे हे व्यक्तिमत्व अंतरीचे फणसासारखे गोड आहे. ‘मऊ मेणाहूनि आम्हीं विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे.’ अशी तुकोबारायांच्या वचनाची प्रचिती त्यांच्या व्यक्तीमत्वातून दिसून येते. ते पिंपरी- चिंचवडशी एकरूप झाले आहेत. त्यांनी येथील संस्कृती आणि संस्कार अंगिकारला आहे.
कला, नाट्य पंढरी म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा लौकिक सर्वपरिचित आहे. अशा शहरात त्यांनी २४ वर्ष केलेले समाजकार्य ही समाजोद्धारक अशीच आहे.
खरे तर, माणूस समजून घेणे हा त्यांचा गुण वाखाणण्यासारखा आहे. विषयातील एकरूपता आणि मांडणी हे त्यांचे बलस्थान आहे. मुद्रित शोधक ते वरिष्ठ वृत्त संपादकपर्यंतची वाटचाल ही लक्षवेधी आणि त्यांच्या केलेल्या लोकसेवेचे फलित आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.असे म्हणले जाते की, ‘समाज समजण्यासाठी माणूस समजायला हवा.’ एखादी व्यक्ती बाह्य आणि अंतरंगाने समजून घेणे महत्वाचे असते. ते जाणून घेणे हे बाळासाहेब ओव्हाळ यांचा गुण विरळाच.
वरकरणी रुक्ष- थोडे गूढ आणि अगम्य वाटणारे बाळासाहेब ओव्हाळ उत्तम खवय्ये आणि गोड आणि मधाळ आहेत. त्यांचे स्मित हास्य आणि क्रीडा आणि कला- रसिक, राजकारणाचे उत्तम भाष्यकार आहेत. आपल्या सहकाऱ्यातील गुणांना प्रोत्साहन देणे हा गुण घेण्यासारखा आहे. तळागाळातील नागरिकांशी सुसंवाद आणि नेतृत्व आणि सदैव शिकण्याची जिज्ञासा हे गुण इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
——
पिंपरी- चिंचवडच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणारे लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यपद्धतीचा आणि कृतीचा वारसा बाळासाहेब ओव्हाळ यांनी जपला आहे.घरची कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाने २०१७ मध्ये पिंपरी-चिवड महानगरपालिकेवर प्रभाग क्रमांक १६ मामुर्डी, किवळे, रावेत,वाल्हेकर वाडी प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. राजकारणासोबतच त्यांनी शहरातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. विकसनशील, दृढनिश्चयी, बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ओव्हाळ
—-
राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर कौतुकाची थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेक कार्यकत्यांना घडविले त्यांचा वारसा पिंपरी-चिंचवड पालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी जपला आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणय, आव्हानांना तोंड देण्याची वृती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोरोनासारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले होते. पिंपरी-चिंचवड शहरासह रावेत साठी विकासाच्या नवनव्या कल्पना ते मांडत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात.
—-
राजकारणासोबतच नागरिकांची बांधिलकी जपत समाजकारण करणारा,सर्वांना अंतर्मुख करणारा प्रत्येकाला आपलंसं करून जनमानसात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करून शहरातील नागरिकांची सांस्कृतिक भूख भागविण्याचे कामही ते करत आहेत. विविध क्रीडा स्पर्धाच्या आयोजनातून शहरात चांगले खेळाडू चढविण्याचे कामही करत आहेत. शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीही ते धडपडत आहेत.
—–
महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नावर त्याचे बारीक लक्ष असते. शहरातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. आपल्या सहकाऱ्यांना, विश्वासात घेऊन त्याना बळ देण्याचेही ते काम करतात. पाणी, आरोग्याच्या सेवेसोबतच प्रभागाच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी भर दिला आहे. कार्यकत्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम बाळासाहेब ओव्हाळ यांनी केले आहे. त्यामुळे रावेत उपनागरासह शहरातील तरुणांचे ते आशास्थान बनले आहेत. त्यातून, त्यांनी शहरात युवा कार्यकत्यांची मोठी फळी तयार केली आहे त्यांच्या रुपाने आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे.
—-
महाराष्ट्र शासनाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नारी शक्ती अभियान, विकसित महाराष्ट्र संकल्प अभियान, इमोशन प्रोग्राम, बांधकाम कागारांना शासकीय योजनांचे लाभ, महिलांच्या सबलीकरणासाठी ते सातत्याने विवध कार्यक्रम राबवित आहेत. जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्याना महापालिका व शासनस्तरा वरून मदत व्हावी, यासाठी ते पुढाकार घेत आहेत. बाळासाहेब ओव्हाळ
यांच्याकडून शहरातील जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत.शहराचे नेतृत्व करो, याच यानिमित्ताने आपणास शुभेच्छा….
—-
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सर्वांशी सलोख्याचे संबंध त्यांनी प्रस्थापित केले आहेत. मैत्री फक्त हितगुज साधण्यासाठी नसावी तर त्या मैत्रीच्या नात्यातून मित्राची प्रगती कशी होईल या तत्वावर चालणारे हसतमुख असे व्यक्तीमत्व असणारे बाळासाहेब ओव्हाळ आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!