पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
विजयादशमी महाेत्सव समिती देहूरोड शहर यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त देहूरोड येथील जय शंकर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. शेकडो भाविकांनी या खिचडीचा लाभ घेतला.
या समितीच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्रीला हा सेवाभावी उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष होते. समितीचे कार्यकर्ते अनिल भोसले, अनिकेत व्यवहारे, राजेश मांढरे, मुकेश पाठक, रोहित रोकडे, अक्षय दाभोळे, राहुल नेटके, आशिष तरस, शंकर स्वामी, सौरभ व्यवहारे, पंकज व्यवहारे, कुणाल दाभोळे, श्रीकांत राव, आशिष जगताप, अमन भुंबक, महेंद्रकर दीपक महेंद्रकर, प्रशांत सामग्री, कांतू कोळी, सचिन रेड्डी , सचिन तिल्लारी, अभिजीत काळे, गौरव अग्रवाल, अजय केंगरे आदी खिचडी वाटपात योगदान दिले. तसेच दिवसभरात एकूण सव्वाशे किलो खिचडीचे वाटप करण्यात आले. जय शंकर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या उपक्रमाचे कौतूक केले.
वैष्णाेदेवी कन्स्ट्रक्शनच्या वतीने ३०० किलो केळी, खिचडी वाटप
बापदेव नगर, किवळे येथील वैष्णाेदेवी कन्स्ट्रक्शनच्या वतीने शिवभक्तांना ३०० किलो केळी आणि ३०० किलो खिचडीचे वाटप करण्यात आले. रंगा स्वामी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी विजय स्वामी, रवी स्वामी, सुरेंद्र मोर्या, पार्वती रंगा स्वामी, ललिता विजय स्वामी यांनी केळी आणि खिचडी वाटपासाठी परिश्रम घेतले. वैष्णाेदेवी कन्स्ट्रक्शनच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.