भोसरी; टीम न्यू महाराष्ट्र
हिंदी साहित्याचा जागर करणाऱ्या ग्रंथदिंडीचे आयोजन करत मास्टर माईंड ग्लोबल स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
हिंदी दिवस निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.प्रदीपा नायर व हिंदी शिक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून नृत्य,गायन,नाटक, वाक्प्रचारांवर आधारित संवाद, नुक्कड नाटिका, हिंदी भाषेविषयी जागरूकता निर्माण करणारे पथ नाट्य सादर केले. शाळेमध्ये हिंदी दिवसाच्या निमित्ताने हिंदी पखवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध स्पर्धां घेण्यात आल्या.तसेच हिंदी ही आपली राजभाषा आहे व तिचा सन्मान हा सर्वांनी केला पाहिजे याचा संदेश या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना देण्यात आला. मुख्याध्यापिकांनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगत कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.