पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवार (दि.28) पासून सुरु होत आहे. पालखी सोहळ्यात दरवर्षीपेक्षा जास्त भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शरहातील तळवडे, देहूरोड, दिघी आळंदी, निगडी आणि भोसरी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
तळवडे वाहतूक विभागातील बदल –
1) बंद मार्ग – देहूगाव कमान (जुना मुंबई पुणे महामार्ग) ते परंडवाल चौक (देहूगाव) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.
पर्यायी रस्ता – भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅनबे चौक ते खंडेलवाल चौक देहूगाव
2) बंद मार्ग – तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक ते महिंद्रा सर्कल हा रस्ता सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग- मोशी भारतमाता चौक, नाशिक हायवे मार्गे इच्छित स्थळी जातील
3) बंद मार्ग – तळेगाव चाकण रोडवरील देहूफाटा येथून देहूगाव जाणा-या रस्त्याने सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील
पर्यायी रस्ता – एच पी चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल
4) बंद मार्ग – परंडवाल चौक ते देहू कमान चौक ते खंडेलवाल चौक हा रस्ता व्हीआयपी व्यक्तींच्या वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. देहुकमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील
देहूरोड वाहतूक विभागातील बदल –
बंद मार्ग – जुना मुंबई-पुणे महामार्गावरील सेंट्रल चौक ते देहूकमानकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे.
पर्यायी मार्ग – सेंट्रल चौक – मामुर्डी – किवळे – भूमकर चौक – डांगे चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल
दिघी आळंदी वाहतूक विभागातील बदल –
1) बंद मार्ग – चिंबळी फाटा चौक, चाकण येथून आळंदी कडे येणारी वाहने आणि आळंदी फाटा-चाकण येथून आळंदीकडे येणारी वाहने
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी चौकातून मॅगझीन चौक मार्गे जाता येईल.
2) बंद मार्ग – चाकण-वडगाव घेनंद शेलपिंपळगाव मार्गे आळंदीकडे येणारी वाहने
पर्यायी मार्ग – कोयाळी कमान, कोयाळी मरकळगाव मार्गे जातील
3) बंद मार्ग – मरकळकडून धानोरे फाटा मार्गे आळंदीकडे येणारी वाहने
पर्यायी मार्ग- धानोरे फाटा – च-होली फाटा – मॅगझीन चौक / अलंकापुरम चौक मार्गे जातील
4) बंद मार्ग – भारतमाता चौक, मोशी, मोशी चौक येथून आळंदीकडे येणारी वाहने
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौकातून मॅगझीन चौक, मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे जातील.
5 ) बंद रस्ता पुणे-दिघी मॅगझीन चौकाकडून आळंदीकडे येणारी वाहने
पर्यायी मार्ग – भोसरी-मोशी-चाकण, च-होली फाटा-कोयाळी, शेलपिंपळगाव आणि अलंकापुरम-जय गणेश साम्राज्य चौक मार्गे जातील.
बंद असणारे मार्ग –
पुणे बाजुकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना चऱ्होली फाटा चौकाचे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
मोशी बाजुकडुन आळंदी कडे येणाऱ्या वाहनांना डुडुळगाव जकात नाक्याचे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
चिंबळी बाजूकडुन आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना केळगाव चौक / बापदेव चौकाचे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
चाकण बाजुकडुन आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना इंद्रायणी हॉस्पीटलचे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
वडगाव घेणंद बाजुकडुन आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना विश्रांतवडचे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या चाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
मरकळ बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना धानोरी फाटा/पीसीएस चौका चे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
वरील मार्गावरील वाहतूक बदल मंगळवार (दि.25) दुपारी 12 पासून ते रविवारी (दि.30) रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार आहे.अथवा वाहतुक सुरळीत होई पर्यंत (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) वाहतूक वळविण्यात येणार आहे.
—————–
निगडी वाहतूक विभागातील बदल –
1) बंद मार्ग – भक्ती शक्ती चौक येथे मुंबईकडून येणारी वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग – ही वाहने काचघर चौकाकडून बिजली नगर चौक मार्गे डांगे चौकातून पुण्याकडे आणि इतरत्र जातील.
2) बंद मार्ग – खंडोबा माळ चौक येथून वाहतूक टिळक चौकाकडे
पर्यायी मार्ग – ती थरमॅक्स चौक मार्गे किंवा चिंचवड मार्गे वळवली आहे.
3) बंद मार्ग – त्रिवेणीनगर चौक येथे रुपीनगर कडून येणारी वाहतूक भक्ती शक्ती चौकाकडे बंद राहील
पर्यायी मार्ग – हि वाहतूक चिकन चौक मार्गे चाकण मार्गे जाईल
4) बंद मार्ग – दुर्गा माता चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – तळवडे रोडने चाकण मार्गाने मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.
5) बंद मार्ग – काचघर चौक येथील वाहतूक सावली हॉटेलकडे व भक्ती शक्ती चौकाकडे जाणारी वाहने
पर्यायी मार्ग – हि वाहने भेळ चौक मार्गे जातील.
6) बंद मार्ग – लोकमान्य हॉस्पिटल ते टिळक चौक

पर्यायी मार्ग – म्हाळसाकांत चौक मार्गे खंडोबामाळ चौकाकडे जाईल.

7) पालखी मुक्कावेळी बंद मार्ग – म्हाळसाकांत चौक ते आकुर्डी गावठाण खंडोबा माळ

पर्यायी मार्ग – ही वाहने टिळक चौक मार्गे जातील.

8) पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दीपज्योती अपार्टमेंट आकुर्डी येथून येणारी वाहतूक मुक्कामाच्या ठिकाणाकडे न येता म्हाळसाकांत चौकाकडे जाईल.

9) पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर विवेकनगर भाजी मंडई आकुर्डी कडून येणारी वाहतूक मुक्कामाच्या ठिकाणाकडे न येता ती शिवम डेअरीला लागून असलेल्या रोडने डावीकडे वळून म्हाळसाकांत चौकाकडे जाईल

10) पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हनुमान मंदिर आकुर्डी येथून येणारी वाहतूक मुक्कामाच्या ठिकाणी न येता म्हाळसाकांत चौकाकडे जाईल.

11) पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सिद्धेश्वर क्लासिक अपार्टमेंट आकुर्डी येथून येणारी वाहतूक मुक्कामाच्या ठिकाणी न जाता ती म्हाळसाकांत चौकाकडे जाईल.

12) काळभोर नगर पासून भक्ती शक्ती चौकाकडे जाणारी वाहतूक ग्रेड सेपरेटर मधून जाईल.तसेच बिजलीनगर चौकाकडून भक्ती शक्ती चौकाकडे न जाता रावेत मार्गे मुंबईकडे जाता येईल.

13) बंद मार्ग – थरमॅक्स चौक ते खंडोबा माळ चौक

पर्यायी मार्ग – वाहने गरवारे कंपनी व खडी मशीन पासून परशुराम चौकाकडे येतील .

14) बंद मार्ग – अप्पुघर चौक ते भक्ती-शक्ती चौक

पर्यायी मार्ग – बिग इंडिया भेळ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

हा बदल शुक्रवारी (दि. 28) मध्यरात्री ते रविवारी (दि.30) सायंकाळी सहा वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत राहणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेच्य़ा वाहनांना परवानगी असणार आहे.

 

भोसरी वाहतूक विभागातील बदल –

1) बंद मार्ग – हावलदार वस्ती (वाय जंक्शन) ते मोशी चौक (दि.27 ते 30) परंयत एकेरी वाहतूक करण्यात आली असून मोशी ते हवालदार वस्तीकडे जाणार रस्ता हा सर्व प्रकारच्या वहानांना बंद असणार आहे.

पर्यायी मार्ग – भारत माता चौकाकडून हवालदार वस्तीकडे जाईल

2) बंद मार्ग – मोशी भारत माता चौक ते वाय जंक्शन जाणाऱ्या जड वाहनास दिनांक 27 ते 30 रोजी प्रवेश बंद.

3) भोसरी पांजरपौळ चौक ते अलंकापुरम चौकाकडे जाणाऱ्या जड वाहनास दि.30 रोजी पहाटे 4 ते रात्री 10 पर्यंत प्रवेश बंद

पर्यायी मार्ग – जड वाहतूक पांजरपौळ चौकातून पुढे भोसरी ब्रीज – जे. आर.डी.टाटा ब्रीज वरून सरळ कोकणे चौक – जगताप डेअरी चौक मार्गे जातील.

 

वरील मार्गावरील वाहतूक बदल हा दि. 27 सहाळी 6 पासून ते दि. 30 रात्री 10 वाजे पर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत राहणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेच्य़ा वाहनांना परवानगी असणार आहे.

 

चिंचवड वाहतूक विभाग –

1) बंद मार्ग – बिजलीनगर ते भक्ती शक्ती चौक

पर्यायी मार्ग – ही वाहने बिजलीनगर चौक येथून डावीकडे वळून डी.वाय.पाटील कॉलेज समोरील मार्गाने रावेत मार्गे मुंबईकडे अथवा डांगे चौक थेरगाव कडे जातील.

2)बंद मार्ग- दळवीनगर ते खंडोबामाळ चौक व दळवीनगर ते चिंचवड

पर्यायी मार्ग – ही वाहने बिजलीनगर चौक मार्गाने इच्छिस्थळी जातील

3)बंद मार्ग – चिंचवड गाव व चापेकर उड्डाण पुल ते महावीर (रिव्हर व्ह्यू चौक व चाफेकर चौक)

पर्यायी मार्ग – ही वाहने चिंचवडे फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी रावेतमार्गे इच्छितस्थळी जातील तसेच भोसरीकडे जाणारी वाहने हि बिजलीनगर चौक संभाजी चौक, भेळ चौक,काचघर चौक, भक्ती शक्ती चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

4) बंद मार्ग – चिंचवडे टी जंक्शन ते महावीर चौक

 

पर्यायी मार्ग – ही वाहने चिंचवडे फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी, रावेत मार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच भोसरीकडे जाणारी वाहने ही बिजलीनगर चौक, संभाजी चौक भेळ चौक काचघर चौक, भक्ती-शक्ती चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

 

5) बंद मार्ग – लोकमान्य हॉस्पीटल ते महावीर चौक

पर्यायी मार्गे – ही वाहतूक लोकमान्य ह़ॉस्पीटल चौकातून दळवीनगर मार्गे जातील.

 

6) बंद मार्ग – एस.के..एसएफ चौक ते खंडोबामाळ

पर्यायी मार्ग –बिजलीनगर चौक मार्गाने इच्छितस्थळी जातील.

7) महावीर चौक चिंचवड येथून पालखी पास होत असताना महाविर चौककडे येणारी वाहतूक पुर्णतः बंद राहणार आहे.

8) श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक चिंचवड येथून पालखी पास होत असताना शिवाजी चौकाकडे येणारी वाहतूक पुर्णतः बंद करण्यात येत आहे.

 

हा वाहतूक बदल 29 जून रोजी दुपारी 4 ते 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत राहणार आहे.

 

पिंपरी वाहतूक विभाग –

1) बंद मार्ग- महावीर चौक ते डी मार्ट सर्व्हीस रोड

पर्यायी मार्ग – डी मार्ट समोरील ग्रेड सेपरेटर मधून वाहतूक वळविण्यात येईल

 

2) बंद मार्ग- अटो क्लस्टर ते हनुमान मंदिर चौक

 

पर्यायी मार्ग- मदर तेरेसा पुलावरून काळेवाडी मार्गे वळविण्यात येणार आहे.

3) बंद मार्ग – पिंपरी पुल ते सम्राट चौक

पर्यायी मार्ग – महावीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील

4) बंद मार्ग -पिंपरी चौक ते गांधीनगर

 

पर्यायी मार्ग – रॉक्सी हॉटेल व गोकुळ हॉटेलमागून इच्छित स्थळी जातील

5) बंद मार्ग – गांधीनगर ते आंबेडकर चौक

पर्यायी मार्ग – नेहरुनगर मार्गे इच्छितस्थळी जातील

6) बंद मार्ग- वल्लभनगर ते पुणे सर्व्हिस रोड बंद

पर्यायी मार्ग – ग्रेडसेपरेटर मार्गे पुणे बाजुकडे जातील

7) वल्लभनगर आऊटलेट बंद

पर्यायी मार्ग – सर्व्हिसरोडने न जाता ग्रेडसेपेरेटर मधून पुण्याकडे जातील

8) बंद मार्ग – केएसबी चौक ते शिवाजी चौक तसेच अटो क्लस्टर

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने केएसबी चौकाकडून भोसरी मार्गे इच्छित स्थळी जातील.

9) बंद मार्गे – सम्राट चौक ते मोरवाडी चौक

पर्यायी मार्गे – या मार्गावरील वाहने रसरंग चौक, मदर टेरेसा ब्रिज मार्गे जातील

 

हा वाहतूक बदल 30 जून रोजी मध्यरात्री ते रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहेत. अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत राहणार आहे

Share

Leave a Reply