मुंबई ः टीम न्यू महाराष्ट्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील शाखा क्रमांक ७७च्या वतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला परिसरातील लहान मुलांचा उंदड प्रतिसाद मिळाला. विजेत्या स्पर्धकांना विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले, अशी माहिती उपशाखाप्रमुख रोमेश चवले यांनी दिली.
या स्पर्धेत जोगेश्वरी परिसरातील गोणी नगर, आझाद नगर, संजय नगर विभागातील अंगणवाडीमधील १३० स्पर्धकांनी भाग घेतला. प्रत्येक स्पर्धकास रिटर्न्स गिफ्ट व वयोगटानुसार चार पारितोषिक ठेवण्यात आले होते. शिवसेना जोगेश्वरी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, विधानसभा समन्वयक रविंद्र साळवी व माजी नगरसेवक शैलेश परब साहेब यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व अंगणवाडी मदतनीस यांना मार्गदर्शन केले. शिवसेना शाखा समन्वयक मधुकर जुवाटकर, उपविभाग समन्वयक महेश गवाणकर यांच्या शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.