पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
आकुर्डी -दत्तवाडी प्रभागातील दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या कट्टर समर्थकांनी आज शनिवार (दि.२२) रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.
शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या कार्यालयात ही भेट घेण्यात आली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांशी पवार साहेबांनी मनोसक्त चर्चा केली. “आम्ही सर्व आपले नेतृत्व मानून या पुढे कार्य करीत यशवंराव चव्हाण व पवार साहेबांच्या विचारांचा वारसा, तसेच शिव, शाहू, फुले, आंबेडकराच्या विचारांचा वारसा जतन करताना संविधान अधिक बळकट करण्याकरिता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे इखलास सय्यद यांनी सांगितले.
या पक्ष प्रवेशाच्या प्रसंगी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत, माजी नगरसेवक विनायक रणसुभे उपस्थित होते.
यावेळी जावेद शेख यांचे जेष्ठ बंधु झाकिर रमजान शेख, चिरंजीव तौहीद जावेद शेख यांचे सह ज्येष्ठ सहकारी अण्णा कुऱ्हाडे, नानासाहेब पिसाळ, प्रवीण पवार यांच्यासह ज्ञानेश्वर ननावरे, वसंत सोनार, यशवंत भालेराव, गोविंद राजेशिर्के, गंगाधर चौधरी, कांतिलाल गड़गुले, सुभाष चौधरी, अण्णा भोसले, अलका कांबळे, सुवर्णा साळवे, सारिका पोटफोडे, मुमताज इनामदार, विमल गायकवाड, फरीदा शेख, ललिता माने, सोनाली जाधव, सुलभा धांडे, गीता सुतार, सुनील मोरे, जिब्राईल शेख, सुरज मोरे, निलेश कदम, समीर शेख, रोहन वरुन, फरीद सय्यद, आदित्य मयंकर, अभिजीत पाटील, अमन शेख, अशरफ बागवान, मुदिन मनियार, रोहित पवार, तालीम शेख, शुभम लोंढे, रतनसिंह कुलकर्णी, अब्ददुल्ला खान, उमेर शेख, ईशांत शेख, अमन शेख, सारंग शिंदे, विक्की गोडसे, सनी गोडसे, सिद्धार्थ पानसरे, नीलेश कदम, साहिल मारले, दिलावर सय्यद, शुभम चव्हाण, अमृत जैस्वार, आरशान शेख, ताहिर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.