मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र
डोबिंवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणात आता अटक करण्यात आली आहे. या भीषण स्फोटप्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिकमधील मेहेरधाम परिसरातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण स्फोटात मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
डोंबिवलीत झालेल्या स्फोटानतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पहिली अटक देखील करण्यात आली आहे. अमुदान कंपनीच्या स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. काल (गुरूवारी) रात्री नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पध्दतीने कारवाई करत मालती मेहता यांना अटक केली आहे.
स्फोटानंतर अमुदान कंपनीचे मालक फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी महिलेचे लोकेशन ट्रेस केलं आणि शो घेतला. आरोपीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. डोंबिवलीतील स्फोटानंतर मुख्य आरोपी मालची मेहता या नाशिकमध्ये पोहोचल होत्या. त्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला होता.पोलिसांच्या टीमने त्यांनी अटक केली आहे. नाशिकमधीन शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आलं. त्यानंतर इतर प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना मुंबईला रवाना करण्यात येणार आहे.