दिनानाश मंगेशकर रुग्णालयाविरोधात राज्य मानवी हक्क आयोगात तक्रार

मुंबई ः टीम न्यू महाराष्ट्र

पुण्यातील नामांकित दिनानाश मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना आता या प्रकरणी ह्युमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शनचे अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. तनिशा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून सदर प्रकरणात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषी अधिकाऱ्यांसह प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौधरी यांची तक्रार दाखल करुन घेतली आहे.

 

पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर  या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. रुग्णालयाने तनिशा भिसे या गर्भवती महिलेच्या उपचारांसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली होती. मात्र,  ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्याचा आरोप एम.डी. चौधरी यांनी केला आहे. तसेच ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून मानवी हक्कास काळिमा फासणारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची   स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून तनिशा भिसे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चौधरी यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल सादर झाला. यामध्ये दिनानाश मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. तर  तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर खासगी रुग्णालयासंदर्भात महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. कोणताही डिपॉझिट घेऊ नका, अशी नोटीस पुणे महानगरपालिकेकडून हद्दीतील सर्व खासगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे.

 

Share

Leave a Reply