दीपक भोंडवे यांच्यावतीने ‘ALERTO’ आपत्कालीन मोबाईल ॲपचे लोकार्पण

रावेत ः टीम न्यूमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘ALERTO’ या आपत्कालीन मोबाईल ॲपचे लोकार्पण समीर लॉन्स, रावेत येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमाचे आयोजन श्री. दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे यांच्या हस्ते ॲपचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय जीएसटी आणि सीमाशुल्क विभागाच्या अधीक्षक  सुवर्णा अथणीकर, रावेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे, तसेच भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ALERTO’ ॲपद्वारे संकटात सापडलेल्या महिलेला केवळ एका क्लिकवर लोकेशन पाठवणे, आपत्कालीन संदेश, सायरन, तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंगसारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे ॲप पोलिसांनाही तपास कार्यात उपयुक्त ठरणार असल्याचे  खिळे यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षेसाठी हे ॲप एक क्रांतिकारक पाऊल ठरेल, असे मत  अथणीकर यांनी व्यक्त केले. महिलांनी या ॲपचे तांत्रिक प्रात्यक्षिक पाहून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि शहरात सुरक्षिततेचे वातावरण तयार होईल, असा विश्वास श्री. दिपक भोंडवे यांनी व्यक्त केला.  सूत्रसंचालन हेमलता चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऍड.  प्रीतीसिंह परदेशी यांनी केले.

Leave a Reply