देवेंद्र फडणवीस यांनी तमाम भोसरीकरांचा अपमान केला – अजित गव्हाणे

-“हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार” म्हणत भोसरीकरांच्या जखमेवरची खपली काढली- अजित गव्हाणे

-सुज्ञ भोसरीकर भाजपाला जागा दाखवतील- अजित गव्हाणे

भोसरी 17 नोव्हेंबर:

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी विधानसभेतील आपल्या उमेदवाराचे कौतुक करताना शनिवारी चिखली येथे झालेल्या सभेत “हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार” असाच काहीसा प्रकार भोसरी विधानसभा मतदारसंघात सुरू असल्याचे वक्तव्य करून
तमाम भोसरीकरांचा अपमान केला असल्याचे महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य अतिशय निंदनीय असून, त्यांच्या या वक्तव्याचा समाचार येथील सुज्ञ मतदार योग्यरित्या घेतील असेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.
अजित गव्हाणे म्हणाले चिखली येथे शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली येथे जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये आपल्या उमेदवारांचे कोड कौतुक करताना त्यांनी तमाम भोसरीकरांचा अपमान केला फडणवीस म्हणाले “हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार” असाच काहीसा प्रकार भोसरी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. असे वक्तव्य करून राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हा सर्व भोसरीकरांचा एक प्रकारे अपमान केला आहे l.आपल्या उमेदवाराचे कोड कौतुक करताना त्यांनी आपल्या गावच्या, येथील नागरिकांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे. त्यांच्या उमेदवारांचे त्यांनी कौतुक करावे हे कौतुक त्यांच्या उमेदवाराला लखलाभ आहे. मात्र असे करताना त्यांनी जी उपमा दिली ती अत्यंत निंदनीय आहे. याबाबत त्यांनी आम्हा भोसरीकरांची माफी मागावी असे देखील गव्हाणे यांनी म्हटले आहे.

गेल्या दहा वर्षात अशाच प्रकारची दडपशाही सुरू आहे .भोसरी विधानसभेतील प्रत्येक नागरिक गेल्या दहा वर्षात कोणत्या ना कोणत्या त्रासातून पुढे गेला आहे. चांगले रस्ते, खड्ड्यांची समस्या ,अपुरा पाणीपुरवठा यामुळे प्रत्येक नागरिक त्रास सहन करत असतानाच अशा प्रकारचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा भोसरीकरांच्या जखमेवरची खपली काढण्याचे काम केले आहे. असे निंदनीय वक्तव्य करणाऱ्यांचा येथील नागरिक येत्या 20 नोव्हेंबर रोजी चांगला समाचार घेतील असे देखील गव्हाणे यांनी म्हटले आहे.

Share

Leave a Reply