दिव्यांगांना खाऊ वाटप; ५८ व्या वर्धापनदिनी शिवसैनिकांनी जपला समाजकारणाचा वारसा

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन राज्यभरात उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त ‌शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देहूरोड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी मामुर्डी येथील माई बालभवनातील दिव्यांगांना खाऊ वाटप करुन वर्धापनदिन साजरा केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा‌वळ तालुका सल्लागार रमेश जाधव यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, युवा सेना मावळ तालुका चिटणीस विशाल दांगट, शहर सल्लागार देवा कांबळे, माजी शहरप्रमुख राजेश शेलार, जेष्ठ शिवसैनिक शिवाजी ठोंबरे, नामदेव पिंजण, विक्रम ठोंबरे, माई बालभवनचे मधुकर इंगळे तसेच विलास हिनुकले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारणाचा वारसा आम्हा ‌शिवसैनिकांना दिला आहे. हा वारसा जतन करण्यासाठी आम्ही माई बालभवनातील दिव्यांग मुलांना खाऊ वाटप केले, अशी माहिती शिवसेनेचे मावळ तालुका सल्लागार रमेश जाधव यांनी दिली.

————————-

Share

Leave a Reply