पिंपरी : प्रतिनिधी
आर्या एंटरप्राइजेस महा-ई-सेवा केंद्र आकुर्डी यांच्या वतीने संभाजीनगर चिंचवड परिसरातील 86 जेष्ठ नागरिकांना मोफत जीवन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी विकास साखरे यांनी पुढाकार घेतला होता.
गेल्या चार वर्षांपासून विकास साखरे हे संभाजीनगर येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत जीवन प्रमाणपत्र वाटपाचा उपक्रम राबवीत आहेत. गेल्या चार वर्षात आतापर्यंत त्यांनी सुमारे 400 ज्येष्ठ नागरिकांना जीवन प्रमाणपत्र वाटप केले आहे. यावर्षी रविवारी (दि. 10 ) संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमास जगद्गुरु श्री साईबाबा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सतीश सराटकर, सचिव नितीन पतंगे, खजिनदार सुभाष घुगे, यांच्यासह मानसिंग माने श्रीकांत पाटील विजय पाचपोर अनिल पठारे, वामन कुलकर्णी हनुमंत सूर्यवंशी आदींसह अन्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या उपक्रमासाठी अश्विनी साखरे आणि आर्यन साखरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान, सध्याच्या दगदगीच्या जीवनामध्ये कुठेही रांग न लावता शिवाय आपल्या घराजवळच तेही मोफत जीवन प्रमाणपत्र उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले. त्याचबरोबर अनेक ज्येष्ठांनी साखरे यांचे आभारही मानले.
विकास साखरे यांच्या माध्यमातून कोरोना काळापासून आम्हा जेष्ठ नागरिकांना दरवर्षी मोफत जीवन प्रमाणपत्र घराजवळ उपलब्ध होत आहेत. त्याशिवाय साखरे हे आमच्यासाठी कायम विना मोबदला विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. नितीन पतंगे,
सचिव जगद्गुरु श्री साईबाबा ज्येष्ठ नागरिक संघ संभाजीनगर.