बारामतीत 17 लाखाहून अधिक मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

बारामती लोकसभा मतदासंघाकरीता येत्या 7 मे रोजी निवडणूक होणार असून मतदारसंघातील सर्व मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे, याकरीता प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. मतदारसंघात आतापर्यंत एकूण 17 लाख 10 हजार 845 मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

बारामती विधानसभा मतदारंसघात एकूण 380 मतदान केंद्रावर 3 लाख 69 हजार 217 मतदार ओळख चिठ्ठीपैकी 2 लाख 87 हजार 277 मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता 380 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण 421 मतदार केंद्रावर 4 लाख 29 हजार 351 मतदार ओळख चिठ्ठींपैकी 2 लाख 51 हजार 471 मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्यात आले आहे. याकरीता एकूण 565 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

इंदापूर विधानसभा मतदारंसघात एकूण 330 मतदान केंद्रावर आज रोजीपर्यंत 3 लाख 23 हजार 541 मतदार ओळख चिठ्ठीपैकी 2 लाख 15 हजार 762 मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता 330 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दौंड विधानसभा मतदारंसघात एकूण 309 मतदान केंद्रावर आज रोजीपर्यंत 3 लाख 4 हजार 607 मतदार ओळख चिठ्ठींपैकी 2 लाख 67 हजार 423 मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता 309 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

भोर विधानसभा मतदारंसघात एकूण 561 मतदान केंद्रावर 4 लाख 7 हजार 921 मतदार ओळख चिठ्ठींपैकी 3 लाख 65 हजार 171 मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता 561 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. खडकवासला विधानसभा मतदारंसघात एकूण 465 मतदान केंद्रावर 5 लाख 38 हजार 31 मतदार ओळख चिठ्ठींपैकी 3 लाख 23 हजार 741 मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता 515 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय मतदार ओळख चिठ्ठी वितरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच ते काम पूर्ण करण्यात येईल. मतदार ओळख चिठ्ठीचे घरोघरी वाटप करण्यात येत असून मतदारांनी याकामी आपल्या दारापर्यंत येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन द्विवेदी यांनी केले आहे

Share

Leave a Reply