चिखली ः टीम न्यू महाराष्ट्र
सिद्धिविनायक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयातर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला विद्याद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी एकूण पाचशे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. डेरल बोरगेस व पुनम जाधव यांनी नेत्र तपासणी केली. शाळेतील नर्सरी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही यावेळी नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी शाळेच्या संस्थापिका निर्मला जाधव आणि सेक्रेटरी मारुती जाधव यांचे सहकार्य लाभले. शाळेतील उर्वरित विद्यार्थ्यांचीही लवकरच नेत्र तपासणी करण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.