पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
रक्तदानाने आपत्कालीन परिस्थितीत अनेक गरजवंतांचे प्राण वाचतात. सामाजिक भान राखत रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत, रक्तदान चळवळीला बळ देणारे घटक समाजासाठी महत्वाचे आहेत असे प्रतिपादन डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. डी. वाय. पाटील यांनी पिंपरी येथे केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलतर्फे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार गोविंद वाकडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी संचालक सोमनाथ पाटील तसेच प्रमोद पाटील, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, श्रीनिवास नागे, सुनील लांडगे, नाना कांबळे, सचिन चपळगावकर, नितीन शिंदे, पराग कुंकूलोळ, गोपाळ मोटघरे, बापू गोरे, कृष्णा पांचाळ, प्रवीण शिर्के, संजय बेंडे, जमीर सैयद, राजश्री आतकरे उपस्थित होते.
कुलपती डॉ. डी. वाय. पाटील पुढे म्हणाले रक्तदान हे आधुनिक काळात अपघात आणि आपत्कालीन स्थितीत जीवदान ठरत असून या बाबत आयोजित केलेले उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच बाळंतपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. भारत देशात १०० कोटी लोकसंख्या असूनही अगदी नगण्य स्वरूपात रक्त संकलित होते”
यावेळी ज्येष्ठ पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार गोविंद वाकडे यांनी मानले.