पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
सध्या सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे. उत्सव कालावधीत सर्वांनी नियमांचे पालन करावे. विशेषता गणेश मंडळांनी उत्सवाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून स्वयंसेवक नेमावेत , अशा सूचना देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिल्या.
देहूरोड गांधींनगर, मरिमाता मार्ग येथील श्री गणेश मित्र मंडळाच्या गणेशाची आरती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख्य उपस्थिती साहेब पोलीस निरीक्षक अजित सावंत, श्री जगदाळे, श्री जाधव व इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी,त्याचप्रमाणे देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माझी नगरसेवक, श्री गणेश मित्र मंडळाचे संस्थापक हाजीमलंग काशिनाथ मारिमुत्तू , काॅग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख, देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष वेंकटेश कोळी, श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर मारिमुत्तू, काॅग्रेस पक्षाचे सचिव गोपाळ राव, कामगार नेते अंजनी इरण्णा , देहूरोड शहर काँग्रेस पर्यावरण सेलचे अध्यक्ष आकाश रामनारायण, निराधार निराश्रीत सेलचे अध्यक्ष अध्यक्ष बबन टोंपे, मंडळाचे पदाधिकारी शंकर मारिमुत्तू, व्यंकटेश मारिमुत्तू, शिवा कंदस्वामी, मुरगन चावलियन, लक्ष्मण चव्हाण, नागेश कस्बे वर्धराज मारिमुत्तू, विजय मारिमुत्तू, भरतराज मारिमुत्तू, देवेंद्र मारिमुत्तू तसेच नागरिक उपस्थित होते.