लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

पिंपरी ; टीम न्यू महाराष्ट्र

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 16) सकाळी तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली.

सूरज राजेंद्र रायकर (वय 28, रा. माळीनगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज याचा विवाह सोहळा आज (मंगळवारी, दि. 16) नियोजित होता. घरात सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. दरम्यान, सकाळी त्याने मामाला फोन केला. “मला लग्न करायचे नाही”, असे सांगून तो घराबाहेर पडला.
घरातल्या मंडळींनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, सुरज सापडला नाही.

काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर वाण्याचा मळा येथील विहिरीजवळ सुरज याची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना शंका आल्याने विहिरीत शोध घेण्यात आला. तेंव्हा सुरजचा मृतदेह आढळून आला. लग्नाच्या दिवशी नवरदेवाने टोकाचे पाउल उचलल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Share

Leave a Reply