आळंदी ः टीम न्यू महाराष्ट्र
आळंदी येथील ग्यानज्योत इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुलांच्या संघाने नेपाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत आणि मुलींच्या संघाने खो खो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले तसेच या दोन्ही संघांनी मिळून एकूण १४ सुवर्ण पदकांची लटलूट केली.
ग्यानज्योत इंग्लिश मीडियम स्कुलच्या १३ वर्षांखालील मुलींच्या संघाने खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या संघातील शेजल घाटुळ, तृप्ती सुरवसे, सिद्धी शेळके, सिद्धी बैस, आरुषी कुकडकर, श्रृती शेजुळ, मुग्धा जामनिक, धनश्री शेजुळ, दिव्या पवार या खेळाडुंनी ९ सुवर्ण पदके पटकावली.
तर कराटे स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या संघानेही विजेतेपद पटकावून तब्बल ७ सुवर्ण पदकांची लयलूट केली. या संघातील आदर्श केदार, अर्जुन वारे, करण वारे, कृष्णा वारे, ओम जाधव, मयंक कोंडे, रोहित दिवार यांनी सुरेख खेळ करीत सुवर्ण पदके पटकावली.
संघाच्या प्रशिक्षक प्रतिभा शुंगारे यांनी या खेळाडुंना मा्रर्गदर्शन केले. तसेच या दोन्ही संघांनी आतापर्यंत तालुका, जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही यश मिळविले आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही यश मिळवित शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असल्याचे गौरवौदगार प्रशिक्षक शुंगारे यांनी काढले.
विजेत्या खेळाडुंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र विठ्ठलराव घुंडरे, संचालिका किर्ती राजेंद्र घुंडरे, संचालक यज्ञकांत ढगे, कार्यकारी संचालक
दत्तात्रय बांडे, मुख्याध्यापिकाप्रीती उंबरकर यांनी अभिनंदन केले.
