नेहरूनगरमधून सर्वाधिक लीड देणार – हनुमंत भोसले

– माजी महापौरांचा विश्वास; परिवर्तनाचा शब्द नेहरूनगर खरा करणार

-अजित गव्हाणे यांना पाठिंबा; नेहरूनगर परिसराने गर्दीचा उच्चांक मोडला

भोसरी 10 नोव्हेंबर:

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा या परिसरामध्ये रविवारी (दि.10) काढलेल्या प्रचार दौऱ्याला उच्चांकी प्रतिसाद मिळाला. रविवारी काढलेल्या या प्रचार दौऱ्याने आत्तापर्यंतच्या सर्व गर्दीचे अक्षरशः रेकॉर्ड मोडले. माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नेहरूनगर मधून सर्वाधिक “लीड” अजित गव्हाणे यांना मिळवून देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर,विरोधी पक्षनेते राहुल भोसले , माजी नगरसेवक समीर मासुळकर तसेच नेहरूनगर , मासुळकर कॉलनी, अजमेरा परिसरातील पक्षाचे आजी माझी पदाधिकारी,ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.

माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून या प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. नेहरूनगर, झिरो बॉईज चौक ,संतोषी माता मंदिर रस्त्यापासून पुढे मासुळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी पासून हा दौरा मार्गस्थ झाला. यावेळी अजित गव्हाणे यांनी गणपती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,संतोषी माता , मारुती मंदिरात दर्शन घेतले. अजित गव्हाणे यांनी विविध सोसायटी धारक ,नागरिक, व्यापारी यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत आगामी काळात त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देणार असल्याचे सांगितले.

यावेळी हनुमंत भोसले यांनी नागरिकांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले अजित गव्हाणे हे शरद पवार यांचे उमेदवार आहेत. शरद पवार यांच्या दूरदृष्टीने आपल्या शहराची प्रगती झाली हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून आपल्याला शरद पवारांना विजयी करायचे आहे. त्यांनी जो संघर्ष उभा केला आहे. त्या संघर्षाला न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे अजित गव्हाणे हे विजयी होणे महत्त्वाचे आहे.


शांतता टिकविण्यासाठी पुढे या-भोसले

कोणी काही म्हणू दे, आपण जे ठरवले तेच करायचे असे आवाहन यावेळी माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नागरिकांना केले. आपला स्वाभिमान जपणारा, आपली कामे करणारा आणि आपल्या भागाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या उमेदवाराला आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. अजित गव्हाणे यांच्या रूपाने आपल्याला उच्चशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला, मुख्य म्हणजे आपल्या भागाला शांततामय वातावरण देणारा उमेदवार लाभला आहे. त्याच्यासाठी जीव ओतून काम करायचे आहे. आपल्या भागातून भरघोस मतांनी त्यांना पुढे न्यायचे आहे. आपण दिलेले लीड पुढच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्या लक्षात राहील असे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहन हनुमंत भोसले यांनी नागरिकांना केले.


नेहरूनगर भागात पाण्याची व्यवस्था, पुनर्वसन प्रकल्प या गोष्टींसाठी पुढाकार घ्यायचा आहे. त्या बरोबरीने महापालिका शाळांचे आधुनिकीकरण, सक्षम ड्रेनेज व्यवस्था ही कामे करण्यासाठी आपल्या महापालिका सदस्यांना बळकटी देणे. राज्य शासनाच्या माध्यमातून येथील तरुणांसाठी कुशलता उपक्रम, क्लस्टर स्थापनेतून तरुणांच्या उद्यमशीलतेला वाव देणे यांसारखे उपक्रम आगामी काळात राबवण्याचे नियोजन आहे.

Share

Leave a Reply