बारामती ः टीम न्यू महाराष्ट्र
बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान मेळाव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा सुमारे २५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लाभ घेतला. या शिबारात औषध वाटपही करण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष आणि निरामय कॅन्सर हॉस्पिटल, केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबाराचे आयोजित करण्यात आले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांनी या शिबिराचे योग्य नियोजन केले होते.
पक्षाच्या जनसन्मान मेळाव्याला उपस्थित राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, लतीफभाई तांबोळी, माजी सैनिक सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक राजेशिर्के आदींसह पोलीस अधिकारी, तसेच पत्रकार बांधवांनी शिबिराला भेट दिली. यावेळी प्रथमोपचार पेटी देऊन वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या शिबिरात तपासणी करुन औषधे घेतली.
यावेळी वैद्यकीय पक्षाचे विस्तारक सचिन सरोदे, पुणे जिल्हाध्यक्ष निनाद टेमगिरे, हवेली तालुका अध्यक्ष विनोद शिंदे, निरामय हॉस्पिटलचे डॉ. विशाल खळतकर, , वैद्यकीय सहाय्यक अभिजीत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय पक्षाचे विस्तारक नीलम पाटील, लक्ष्मण सुरवसे, केदार केळकर यांनी शिबिरासाठी परीश्रम घेतले.