रुग्णवाहिकेचे लोकार्पण, स्नेहमेळावा, शालेय साहित्यांचे वाटप करून इरफान सय्यद यांचा वाढदिवस साजरा

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

शहरातील गरीब, गरजू रुग्णांच्या मदतीसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण, स्नेहमेळावा, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजनेच्या धनादेशाचे वाटप करून कामगार तथा शिवसेना नेते इरफान सय्यद यांचा वाढदिवस विविध विधायक उपक्रमांनी साजरा झाला. दरम्यान वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना भेटून आशीर्वाद घेतले तर राज्यमंत्रीमंडळातील विविध खात्याचे मंत्री, शिवसेना नेते, उपनेते, राजकीय नेते यांनी दूरध्वनीद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या.

इरफान सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त यमुनानगर येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे सदस्य अमित गोरखे, माजी नगरसेवक तुषार हिंगे, प्रवीण भालेकर, रवींद्र सोनवणे, प्रसाद शेट्टी, सीमा साळवे , शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे नगरसेवक राहुल भोसले, पंकज भालेकर, भाजपचे विजय फुगे , शाम लांडे,भोसरी विधानसभा प्रमुख संभाजी शिरसाठ, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर , युवा सेनेचे रुपेश कदम , उद्योजक रमेश चौधरी, विजय फुगे, धनंजय भालेकर रिपाईचे बाळासाहेब भागवत , युवानेते सिद्धार्थ बनसोडे , उद्योजक, प्रदीप धामणकर, रवी गोडेकर, प्रमोद शेलार, संतोष साळुंखे, किशोर जैद, रॉकी अगरवाल, दीपक जाधव, महेंद्र ठाकूर, संजय सोलंकी, दिलीप, सोळंकी, युवा नेते , निलेश बोराटे संदीप रासकर, संदीप मधुरे, डॉ. प्रताप सोमवंशी, महेश शेटे युवा नेते, अतिश बारणे, आझाद मुलानी, रिक्षा संघटनेचे बाबासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर , संतोष तापकीर , महायुती तसेच महाविकास आघाडीतील नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, माथाडी, बांधकाम कामगार, मित्र परिवार आदीं स्नेहमेळाव्यास उपस्थित होते.

दरम्यान भोसरी मतदार संघात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणेच यंदाही वृत्तपत्रविक्रेत्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पिंपरी चिंचवड शहर, इरफानभाई सय्यद युवा मंच, साद सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र मजदुर संघटना यांनी केले.

——————

कामगारांना न्याय मिळवून देणारा नेता

शहरातील गरीब, गरजू रुग्णांच्या मदतीसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले इरफान सय्यद यांच्याकडे जनसेवेचा खरा वसा आहे . दरवर्षी वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकहिताचे उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे कार्यकर्ते करत असतात. गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी चिंचवडनगरी ही कामगारनगरी आहे. या नगरीत माथाडी कामगार, इतर कामगारांचे प्रतिनिधित्व इरफान सय्यद शिवसेना नेते म्हणून करत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. कामगारांच्या मागण्यांना तुम्ही न्याय मिळवून देता असे गौरवोद्गार खासदार बारणे यांनी यावेळी काढले.

Leave a Reply