पिंपळे निलखमध्ये ‘हरित क्रांती’ची प्रेरणादायी सुरुवात

पिंपळे निलख ः टीम न्यू महाराष्ट्र

   वृक्ष रुपी हिरवी ओळख  या अर्थपूर्ण संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत, पिंपळे निलख परिसरात एक प्रेरणादायी वृक्षारोपण उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाची संकल्पना आणि पुढाकार आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांचा होता.  या उपक्रमाला  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमात स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांमध्ये सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, उद्यान अधीक्षक योगेश वाळूंज, सहाय्यक अधीक्षक राजेश वसावे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, आणि उद्यान सहाय्यक अनिल गायकवाड यांचा विशेष सहभाग होता.

कार्यक्रमात विविध स्थानिक वृक्षप्रजातींचे रोपण करून परिसराच्या हरित सौंदर्यात भर घालण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच, या झाडांची जबाबदारीही प्रत्येकाने घेण्याचा निर्धार करण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरात प्रदूषणमुक्त व हरित वातावरण निर्माण होण्यास चालना मिळणार आहे.

या उपक्रमामुळे पिंपळे निलख परिसरात एक नवीन हरित पर्वाची सुरुवात झाली आहे. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून या चळवळीचा आवाका भविष्यात आणखी वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

 रविराज काळे म्हणाले, “हिरवे पर्यावरण ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याची काळजी घ्यावी. हीच झाडं आपल्या भावी पिढीसाठी हिरवा श्वास ठरणार आहेत.

Leave a Reply