रावेत येथे विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा

 

पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र

रावेत येथील श्री दीपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशनच्या वतीने  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चंद्रभागा कॉर्नर, रावेत येथे महिलांसाठी  संपूर्ण  दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमांमध्ये महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. 

सामाजिक कार्यकर्त्या  सुप्रिया दिपक भोंडवे आणि मोनाली संतोष भोंडवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम श्री दीपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन आणि एएसजी आय हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या  शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत नेत्र तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले.  समस्या निदान झालेल्या नागरिकांच्या  शस्त्रक्रियांसाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

चंद्रभागा कॉलर येथे महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम

तसेच चंद्रभागा कॉलर येथे महिला बचत गटाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  सुप्रिया दिपक भोंडवे आणि  मोनाली संतोष भोंडवे यांनी उपस्थित महिला सदस्यांना मार्गदर्शन करत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. महिला सबळीकरण आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करता यावे यासाठी स्वरोजगार-उद्योग उभारणीसाठी चंद्रभागा कॉर्नर महिला बचत गटाची स्थापनाही करण्यात आली.

सिद्धिविनायक आयुर्वेदामार्फत आयुर्वेद तपासणी

त्यानंतर ‘सिद्धिविनायक आयुर्वेदा’ यांच्यामार्फत आयुर्वेद तपासणी शिबिर घेण्यात आले.   संपूर्ण दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येत महिलांनी जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता.  याप्रसंगी  संतोष (अप्पा) भोंडवे, चंद्रभागा  काॅर्नर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुतेजकुमार चौधरी, त्याचप्रमाणे सर्व कार्यकारणी आणि सभासद उपस्थित होते.

Share

Leave a Reply