राजमाता महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा 

भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी येथे २१ जून रोजी “जागतिक योग दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत योगसाधना ही मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक ठरत आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन महाविद्यालयात योगदिनानिमित्त विविध योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, मंडूकासन, तसेच सूर्यनमस्कार सादर केले. ‘ॐ’काराच्या शांत उच्चारांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे, यांनी केले. त्यांना प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी व उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे यांचे सहकार्य लाभले. सर्वांनी विद्यार्थ्यांसमवेत प्रत्यक्ष योगसाधना केली.

या प्रसंगी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगसाधनेच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply