आज दिनांक २४ मे २०२३, बुधवार रोजी मुंबई इंडियन्स कॉलिफायर २ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लखनौ सुपर जायंट्सशी लढणार आहेत. सामना हा कालचेच मैदान, एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेपॉक येथे होणार आहे. आज जो हि सामना हरेल त्याला दुसरी संधी न मिळत थेट सामान बांधून घरी जावे लागणार असून आजच्या सामन्यात दोन्ही संघ अधिक तीव्रतेने खेळतील असे म्हणू शकतो. रोहित शर्मा आणि कृणाल पंड्या यांनी यावर्षी स्वतःच्या संघाचे चांगले नेतृत्व केले आहे.
आयपीएलमध्ये प्ले-ऑफ ला पात्र ठरण्यासाठीचा प्रवास यावर्षी अत्यंत मनोरंजक झाला. समर्थकांना शेवटच्या दिवसापर्यंत माहित नव्हते कि तिसऱ्या व चौथ्या स्थानावर कुठले संघ येतील. परंतु शेवटच्या दिवशी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे प्ले ऑफ खेळायला पात्र ठरले. मालिकेच्या सुरवातीला बुमराह विना असणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजीने कर्णधार रोहित शर्मा स्वतःच्या संघाला प्ले ऑफ खेळवेल हे कुणी सांगितले नसते. परंतु चांगल्या नेतृत्वाने ते आता एवढ्या पुढे आले आहेत. लखनौ चा प्रवासही काही सरळ नव्हता. मालिकेच्या सुरवातीलाच कर्णधार के. एल. राहुल याला दुखापत झाल्याने संघाचे पुढे जाण्यावर मोठा प्रश्न चिन्ह होते. परंतु कृणाल पंड्याने संघाला सावरले व ते आज मुंबई इंडियन्स विरुद्ध एलीमिनेटर खेळणार आहेत.
राहुलची अनुपस्थिती लखनौसाठी महाग पडू शकते. त्याचे अंक हे मुंबई इंडियन्स विरुद्ध अप्रतिम आहेत. काल आपण चेपॉकवर बघितले की ते पीच अतिशय मंदावले आहे. १६०/१७० धावा काढायला सुद्धा संघाना घाम फुटत आहे. फिरकी गोलंदाजांना फायदा देणाऱ्या ह्या मैदानावर लखनौचा फिरकी गोलंदाज रवी बिष्णोई आणि अमित मिश्रा हे मुंबईच्या फलंदाजांची चांगली चाचणी घेऊ शकतात. मुंबईकडेही पियुष चावला चा अनुभवी आणि उत्तम पर्याय आहे. दोन्ही संघांची फलंदाजीची सामान पातळी वर आहे असे म्हणू शकतो.
एलएसजी चे संभाव्य ११- क्विंटन डी कॉक (WK), काईल मायर्स, कृणाल पंड्या (C), प्रेरक मंकड, मार्कस स्टोइनीस, निकोलस पूरण, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिष्णोई, मोहसीन खान, आवेश खान.
एमआय चे संभाव्य ११ – रोहित शर्मा (C), ईशान किशन (WK), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेविड, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश माधवला.