Maharashtra HSC Result 2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल गुरूवार दि. 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.याबाबत राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली आहे.
या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येणार
पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे (२५ मे) दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.
गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार
12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
निकालानंतर प्रवेश प्रक्रिया
यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे.
बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल.