मुंबई ः टीम न्यू महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने विविध उपक्रम राबवून मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला. या निमित्त मुंबई येथील अंधेरी परिसरात मराठी भाषेचा जागर करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर यांनी या कायर्क्रमासाठी पुढाकार घेतला होता. मराठी भाषा दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांची नामांकित पुस्तके समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेट देण्यात आली. या मध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत भोसले, अंधेरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे प्रसिद्ध विधीज्ञ जाधव, तसेच बेस्ट अधिकारी आणि बेस्ट कर्मचारी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी यांना भेटवस्तू म्हणून कवी कुसुमाग्रज यांची निवडक नामांकित पुस्तके भेट देण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर, चिटणीस मंगेश परब, सुनील दर्गे, उपाध्यक्ष संजय देवळे, संदेश जगताप,श्व अविनाश जैतापकर, रोहित बेंद्रे, तिर्थराज चवरे, अरुण खेतमर, शशिकांत सागवेकर आदी उपस्थित होते.