महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी विजय जरे

पिंपरी ः न्यूज महाराष्ट्र

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी चिखली-मोरे वस्ती येथील विजय जरे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रशांत पाटणे यांनी एक वर्ष  कालावधीसाठी ही नियुक्ती जाहिर केली.

तर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माझी खासदार संभाजीराजे छत्रपती  यांनी जरे यांना नियुक्ती पत्र दिले आहे. जरे यांनी यापूर्वी स्वराज्य पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर निमंत्रक पदावर दीड वर्ष काम केले. या कालावधीत त्यांनी शहरातील महावितरणशी निगडीत विविध प्रश्न, अवैध धंदे, सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या तसेच वाहतूक कोंडीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. या कार्याची दखल घेऊन त्यांना शहराध्यक्ष या पदावर  बढती देण्यात आली.

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी मोठ्या विश्वासाने शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ती यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पिंपरीची चिंचवड शहरात तरुणांचे संघटन करुन पक्षसंघटना बळकट  करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जरे यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची यादीही पक्षाने मागविली आहे. तीही लवकरच पक्षनेतृत्वाकडे देणार असल्याची माहिती जरे यांनी दिली.

Share

Leave a Reply