मनाेज जरांगे पाटलांचे २० तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणास्त्र

छत्रपती संभाजीनगर ः टीम न्यू महाराष्ट्र

मराठ्यांना सगेसोयऱ्यांसह आरक्षणासह  ठरलेल्या ९ मागण्या मान्य करा. अन्यथा २८८  आमदार पाडल्याशिवाय थांबत नाही,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला दिला आहे. तसेच २० तारखेपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु करणार असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.

मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात शांतता रॅली काढण्यात आली आहे. हिंगोलीपासून सुरुवात झालेल्या या शांतता रॅलीचा  शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत जरांगे-पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. तसेच २० तारखेपासून अंतरवाली-सराटीमधून आमरण उपोषण सुरु करण्याची  घोषणाही जरांगे यांनी केली.

त्याचबरोबर मुंबईला कधी जायचे याची तारीख  ठरवणार आहोत. शिंदे आणि फडणवीस साहबे मराठे मुंबईत येऊ शकतात. मुंबईत आल्यावर कसं होईल ? असा सवाल त्यांनी विचारला. मला अंतिम डाव टाकू द्या, सरकारने दोन-तीन डाव टाकले आहेत. यांचे खासगी ड्रोन कशासाठी होते ते पाहू द्या. ज्या विभागचे क्षेत्र नाही त्यांनी आरक्षणासाठी बैठका लावल्या, यांची काय नियत आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.

Share

Leave a Reply