खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी मंगेश हुलावळे व शरद कुटे

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची सभापती शिवाजी असवले, उपसभापती अमोल भोईरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची सभा पार पडली. या सभेत तज्ञ संचालकांची निवड करण्यात आली. यामध्ये तज्ञ संचालक पदी मंगेश हुलावळे व शरद कुटे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी, संघाचे संचालक किरण हुलावळे, बाजीराव वाजे, एकनाथ येवले, माणिक गाडे, रुपेश घोजगें, गणेश विनोदे, प्रमोद दळवी, रमेश भूरुक, शहाजी कडू, ज्ञानेश्र्वर निंबळे, विष्णू घरदाळे, शरद नखाते, मधुकर जगताप, आशा खांडभोर, मनीषा आंबेकर, सुनीता केदारी, सचिव किरण लोहर उपस्थित होते.

दरम्यान महिन्यापूर्वी झालेली खरेदी विक्री संघाची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात आली होती, निवडणुकीच्या वेळी महायुती नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केलेल्या कार्यकर्त्यांना तज्ञ संचालक पदी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार आज हुलावळे व कुटे यांची नियुक्ती करण्यात आली असून आगामी पाच वर्षाच्या कार्यकाळात विविध कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे नेत्यांनी सांगितले

Leave a Reply