मुंबई ः टीम न्यू महाराष्ट्र
मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले असून त्यांनी मराठवाड्यात जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. त्यांच्या या रॅलीला जाेरदार प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, जरांगे पाटलांचा जलवा परदेशातही पाहायला मिळत आहे. सिंगापूर येथे मराठा तरुणांनी जरांगे पाटलांचे बॅनर झळकावून मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहे. शांतता रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील मराठावाड्यातील जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या भेटीला जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता आता सिंगापूरपर्यंत पोहोचली आहे.
हिंगोलीच्या हयातनगर आणि शेवाळा या गावातील तरुणांनी सिंगापूर येथे मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर झळकावले आहेत. हयातनगर गावातील ज्ञानेश्वर सोळंके आणि शेवाळा गावातील अविनाश पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर नेऊन सिंगापूरच्या मार्रलिओन पार्कमध्ये झळकावले . यावरुन मराठा युवकांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळते आहे.