प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांची माहिती
पुणे ः टीम न्यू महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांची राज्यस्तरीय बैठक 15 मे रोजी पुण्यात पार पडली. या बैठकीत पत्रकार संघाच्या आगामी दिशा, धोरणे आणि कार्ययोजना निश्चित करण्यात आल्या. याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मराठवाडा विभागाचे पहिले रौप्य महोत्सवी अधिवेशन 15 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
या अधिवेशनात मराठवाड्यातील यशस्वी रत्नांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. अधिवेशनासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या वतीने जबाबदारी स्वीकारली असून, विभागीय अध्यक्ष अनिल सावंत हे संपूर्ण संयोजन पाहणार आहेत.
बैठकीत उपस्थित प्रमुख मान्यवर:
-
संजय भोकरे (संस्थापक, राज्य संघटक)
-
गोविंद वाकडे (प्रदेशाध्यक्ष)
-
डॉ. विश्वासराव आरोटे (सरचिटणीस)
-
अशोक देडे (उपाध्यक्ष)
-
नवनाथ जाधव (प्रसिद्धीप्रमुख)
-
वैभव स्वामी (संपर्कप्रमुख)
-
संदीप भटेवरा (सांस्कृतिक विभाग प्रमुख)
-
अनिल रहाणे (कार्यकारिणी सदस्य)
या अधिवेशनात कोणते मान्यवर आमंत्रित करायचे, कोणत्या पत्रकार रत्नांचा सन्मान करायचा, आणि अधिवेशनाची रुपरेषा कशी असावी, याबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यस्तरीय समितीने याला संमती दिली असून संपूर्ण आयोजनाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
राज्यस्तरीय बैठक ः 7 जून, पुणे
पत्रकार संघाची पुढील वाटचाल, ध्येय धोरणे, सभासद प्रक्रिया, निवडणूक पद्धती, तसेच तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय मेळावे याबाबत चर्चा करण्यासाठी 7 जून 2025 रोजी पुण्यात राज्यस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. यामध्ये महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र संघटना स्थापन करण्यासंदर्भातही चर्चा होणार आहे.