मर्सिडिज बेंन्झ इंडियाची यंदाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 4775 कार्सची विक्री

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

भारतातील सर्वात जास्त पसंतीच्या लक्झरी कार उत्पादक मर्सिडिज-बेंन्झने आज 18,928 नवीन मर्सिडिज-बेंन्झच्या विक्रीसंख्येसह आर्थिक वर्षातील एकूण विक्रीप्रमाण जाहीर केले. कंपनीने जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीतही 4,775 नवीन मर्सिडिज-बेंन्झची विक्री केली. नवीन उत्पादन सादरीकरण, दर्जेदार नेटवर्क अपग्रेडेशन आणि उंचावलेला ग्राहक अनुभव हे मर्सिडिज-बेंन्झच्या चांगल्या विक्रीमागचे मुख्य कारण होते.

मर्सिडिज-बेंन्झ इंडियाचे ‘Desire to Exceed’ बाजार धोरण ग्राहकांची निष्ठा वाढवण्यामध्ये आणि भारतीय बाजारात ब्रँडची लोकप्रियता अधिक दृढ करण्यात यशस्वी ठरले आहे. Core आणि Top-End Luxury विभागातील मजबूत कामगिरी ही मागील आर्थिक वर्ष आणि आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाही विक्रीतील मुख्य आकर्षण राहिले असून BEV मध्ये वेगाने झालेल्या वाढीने त्याला अधिक चालना मिळाली.

Top-End Luxury विभागासाठी जोरदार मागणी 

मर्सिडिज-बेंन्झ इंडियाच्या आर्थिक वर्ष 24-25 आणि आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत विक्रीतील मुख्य ठळक बाब म्हणजे S-Class, Mercedes-Maybach, EQS SUV आणि AMG रेंज यांचा समावेश असलेल्या Top-End Luxury विभागासाठीची मजबूत आणि सातत्यपूर्ण मागणी. आर्थिक वर्ष 24-25 मध्ये Top-End Luxury विभागातील विक्रीत 34% वाढ झाली असून S-Class, Mercedes-Maybach Night Series, G 580 with EQ Technology, EQS SUV आणि प्रतिष्ठेची AMG G 63 यासाठी जोरदार मागणी होती. आर्थिक वर्ष 2025च्या पहिल्या तिमाहीमध्ये मर्सिडिज-बेंन्झ ने भारतात विकलेल्या विकल्या गेलेल्या 4 कार्स पैकी 1 हून अधिक कार या ‘Top-End Luxury’ वाहनांमधील होती. Top-End Luxury विभागातील प्रतीक्षा कालावधी 4 महिन्यांपासून सुरू होतो आणि प्रतिष्ठेच्या AMG G 63 साठी 1 वर्षापर्यंत वाढतो.

‘Core’ विभागासाठी सातत्यपूर्ण मागणी 

मर्सिडिज-बेंन्झ चा ‘Core’ विभाग आर्थिक वर्ष 24-25 आणि आर्थिक वर्ष 2025 ची पहिली तिमाही या कालावधीत विक्रीत सर्वात मोठा योगदान देणारा ठरला. C-Class, E-Class LWB सेदान्स, GLC आणि GLE SUVs यांचा समावेश असलेल्या Core विभागाने ग्राहकांची इच्छा आणि निष्ठा कायम ठेवली आणि मर्सिडिज-बेंन्झच्या एकूण विक्रीमध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलला.
आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये E-Class LWB (आता डायनॅमिक E 450 प्रकारासह उपलब्ध) यशस्वी ठरली आणि सर्व बाजारपेठांमध्ये खूप चांगला ग्राहक प्रतिसाद मिळाला. Long Wheelbase E-Class ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी लक्झरी कार राहिली आहे.

Entry Luxury विभाग:

मर्सिडिज-बेंन्झ चा ‘Entry Luxury’ विभाग लक्झरी ग्राहकांसाठी जास्त मूल्य असलेली उत्पादने देतो. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये, मर्सिडिज-बेंन्झ च्या Entry Luxury विभागात 28% घट झाली. हा मुख्यतः कमी किमतीच्या आणि जास्त ऑफर असलेल्या उत्पादनांनी व्यापलेला विभाग आहे. मर्सिडिज-बेंन्झची उत्पादने वैशिष्ट्यपूर्ण आणि पूर्णपणे लोडेड असून, वाढत्या ग्राहक अपेक्षांसाठी मूल्य-आधारित विक्री दृष्टिकोन दिसून येतो.

Share

Leave a Reply